१४९. ती अशी
ती करते प्रेम माझ्यावर
देते जीवाला जीव
आवडते मलाही ती तशीच
करतो प्रेम अतीव
कधी रूसते ती माझ्यावर
बोलत नाही अजिबात
थोडा वेळ गेल्यावरती
तिच करते सुरूवात
कधी भांडते ती माझ्याशी
काढते राग सगळा
विश्वास बसत नाही माझा
स्वभावच तिचा वेगळा
कधी येते खुशीत तेव्हा
करते वर्षाव प्रेमाचा
वागलो जरा अति की
फोडते भोपळा भ्रमाचा
तरीही हवा तिला मीच
आणि मलाही तिचीच ओढ
ती अशीच आहे थोडी
आंबट तिखट कडू गोड
--- लबाड बोका
ती करते प्रेम माझ्यावर
देते जीवाला जीव
आवडते मलाही ती तशीच
करतो प्रेम अतीव
कधी रूसते ती माझ्यावर
बोलत नाही अजिबात
थोडा वेळ गेल्यावरती
तिच करते सुरूवात
कधी भांडते ती माझ्याशी
काढते राग सगळा
विश्वास बसत नाही माझा
स्वभावच तिचा वेगळा
कधी येते खुशीत तेव्हा
करते वर्षाव प्रेमाचा
वागलो जरा अति की
फोडते भोपळा भ्रमाचा
तरीही हवा तिला मीच
आणि मलाही तिचीच ओढ
ती अशीच आहे थोडी
आंबट तिखट कडू गोड
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा