१४८. चौकट
व्हायचं आहे मला खरंतर
तुझा सगळ्यात जवळचा मित्र
माझ्या मनाच्या कॅनव्हासवर
काढलंय मी तुझंच चित्र
तुला आवडतील असेच आणि
भरेन मी त्यात रंग
असं सुंदर चित्र पाहून
तू ही होऊन जाशील दंग
जपेन तुझं चित्र मी
होऊ देणार नाही विस्कट
घेईन सामावून मी तुला
तुझ्या चित्राची होऊन चौकट
--- लबाड बोका
व्हायचं आहे मला खरंतर
तुझा सगळ्यात जवळचा मित्र
माझ्या मनाच्या कॅनव्हासवर
काढलंय मी तुझंच चित्र
तुला आवडतील असेच आणि
भरेन मी त्यात रंग
असं सुंदर चित्र पाहून
तू ही होऊन जाशील दंग
जपेन तुझं चित्र मी
होऊ देणार नाही विस्कट
घेईन सामावून मी तुला
तुझ्या चित्राची होऊन चौकट
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा