१५०. उदास
अशी कशी गेलीस एकटीच
काहीच न सांगता सवरता
मी थांबलो होतो इथे
तुला गुपचूप भेटण्याकरता
तुझ्या नुसत्या असण्यानेच
वाटत असतं किती बरं
तुझ्याशिवाय करमत नाही
हेच शेवटी आहे खरं
तू घरात नाहीस पण
उदास उदास वाटतंय सारं
उघडी असूनही बंदच वाटतात
तुझ्या घराची खिडक्या दारं
--- लबाड बोका
अशी कशी गेलीस एकटीच
काहीच न सांगता सवरता
मी थांबलो होतो इथे
तुला गुपचूप भेटण्याकरता
तुझ्या नुसत्या असण्यानेच
वाटत असतं किती बरं
तुझ्याशिवाय करमत नाही
हेच शेवटी आहे खरं
तू घरात नाहीस पण
उदास उदास वाटतंय सारं
उघडी असूनही बंदच वाटतात
तुझ्या घराची खिडक्या दारं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा