२१३. पेच
पडली आहेस प्रेमात माझ्या
करूया म्हणतेस लग्न
पडला आहे पण मला
खूपच मोठा प्रश्न
माझ्यावरती करून प्रेम
केलास माझा सन्मान
नकार तुला देऊन मग
कसा करू अपमान
येतच नाही तुझ्याबद्दल
मनात कोणतीच भावना
प्रेम तर राहिलं दूरच
येतही नाही वासना
पैशांसाठी लग्न करणं
मनाला नाही पटत
खरंच सांगतो तुझ्याबद्दल
काहीच नाही वाटत
बोलत असतो हसून तुझ्याशी
खरंतर बळेबळेच
काय करावं कळत नाही
पडलाय मोठा पेच
--- लबाड बोका
पडली आहेस प्रेमात माझ्या
करूया म्हणतेस लग्न
पडला आहे पण मला
खूपच मोठा प्रश्न
माझ्यावरती करून प्रेम
केलास माझा सन्मान
नकार तुला देऊन मग
कसा करू अपमान
येतच नाही तुझ्याबद्दल
मनात कोणतीच भावना
प्रेम तर राहिलं दूरच
येतही नाही वासना
पैशांसाठी लग्न करणं
मनाला नाही पटत
खरंच सांगतो तुझ्याबद्दल
काहीच नाही वाटत
बोलत असतो हसून तुझ्याशी
खरंतर बळेबळेच
काय करावं कळत नाही
पडलाय मोठा पेच
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा