५२. तू जवळ असताना
तू जवळ असताना
अवती भवती कुणी नसावं
हात तुझा हातात घेऊन
हळूच तुला जवळ घ्यावं
डोळ्यात तुझ्या मिसळून डोळे
एकटक मग तुला पहावं
चेहरा तुझा धरून ओंजळीत
ओठांच दिर्घ चुम्बन घ्यावं
कुणी पहात नाहीसं पाहून
घट्ट तुला मिठीत घ्यावं
विसरून जाऊन सर्व जगाला
बाहुपाशात हरवून जावं
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा