२२ . तुझं प्रेम
शब्दाशब्दातून तुझ्या
प्रेमच प्रेम फुलत असतं
आणि तुझ्या नजरेतून
नुसतं प्रेमच पाझरत असतं
तुझ्या स्पर्शातूनही
प्रेमच उत्कट स्पर्शत असतं
तुझ्या हसण्य़ातूनही
प्रेमच जणू हर्षत असतं
वागण्यातूनही तुझ्या
प्रेमच जसं बाणवत असतं
असण्यातूनही तुझ्या
प्रेमच फक्त जाणवत असतं
प्रेम कसं करावं ते
तुला खूपच चांगलं कळतं
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
मन माझं न्हाऊन निघतं
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा