४५ . भास
लावलेस तू वेड मला
नाही मन थाऱ्यावर
दिसते फक्त तुझी छाप
आता मला साऱ्यावर
ध्यानी मनी तुझा ध्यास
नाही जीव भानावर
मन अजून झुलतंय माझं
मेंदीच्याच पानावर
अवती भवती तुझेच भास
होतात आता वारंवार
आताशा मी काढत बसतो
तुझीच चित्रे भारंभार
तुझीच स्वप्ने पडतात मला
झोपेतूनही उठल्यावर
तुझाच चेहरा दिसतो मला
डोळे देखिल मिटल्यावर
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा