५५. पश्चाताप
तुला पिडायला आवडतं मला
कारण तू आवडतेस खूप
पाहायलाही आवडतं मला
तुझं ते चिडलेलं रूप
मस्करी करतो मी तुझी
लावून घेतेस तू मनाला
मुर्खात तुला काढतो म्हणून
राग येतो माझा तुला
लक्षात माझ्या आलं नाही
मनाने तू गेलीस दूर
तू अशी दुरावलीस तरी
मी होतो मस्तीत चूर
आता आलीय ध्यानात माझ्या
काय होतेय माझी चूक
तुला काही बोलणार नाही
तुझ्या समोर राहीन मूक
खरंच मला आवडतेस गं
तू जशी आहेस तशी
खरंच माझं प्रेम आहे
खात्री तुझी पटवू कशी
येऊन भेट एकदा मला
मागीन माफी प्रत्यक्ष भेटीत
जाईल राग तुझा सगळा
येशील जेव्हा माझ्या मिठीत
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा