५४. आर्जवं
सारखी तुझी आठवण येते
पण तू काही येत नाही
मनामधून तुझा विचार
काही केल्या जात नाही
माझं प्रेम आहे तुझ्यावर
मी विसरु शकत नाही
तुझंही प्रेम होतं माझ्यावर
तुला कसं आठवत नाही
किती आर्जवं करू तुझी
दया तुला येत नाही
अजून तुझ्या हृदयाला
पाझर कसा फुटत नाही
तुझ्याशिवाय जगण्याचा
विचार सुद्धा करवत नाही
तुझ्या अशा विरहाची
वेदनाही सोसवत नाही
सोडून तू गेल्यापासून
अन्न गोड लागत नाही
सतत तुझ्या विचारांनी
झोपही धड लागत नाही
किती प्रयत्न केले तरी
तू मुळीच भेटत नाही
आता तुला कशी माझी
जराही काळजी वाटत नाही
मला असा त्रास देऊन
मन तुझं भरत नाही
तुझ्याशिवाय इतर कशात
मन माझं लागत नाही
असं कसं नशीब माझं
मरण सुद्धा येत नाही
तुझ्यात गुंतून पडल्यामुळे
जीव सुद्धा जात नाही
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा