४९ . आतुर मी
मी खुपदा पाह्यलय तुला
एकटक माझ्याकडे बघताना
मी यायच्या जायच्या वेळी
वाट माझी बघताना
मी जवळ आले की
होतोस तू कावराबावरा
गंमत खूप वाटते मला
बघून तुझा तो चेहरा
मलाही आवडतोस तू
कळत नाही काय तुला
मी ही आतुर आहे आता
तुला हो म्हणायला
वाट बघत असते रोज
कधी येऊन भिडशील मला
पण खूपच वेळ लागतोय तुला
सरळ येवून विचारायला
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा