४८ . तुझीच मूर्ती
मन माझं गुंतून पडलंय
तुझ्या आठवणींच्या गुंत्यात
तुझ्या आठवणींचा गंध
दरवळतोय अजून मनात
तुझा मखमालीचा स्पर्श
भिनलाय माझ्या रोमारोमात
तुझा मंजुळ मधाळ स्वर
घुमतोय माझ्या अजून कानात
तुझी सुंदर नाजुक छबी
तरळतेय अजून डोळ्यात
तुझं लोभसवाणं हास्य
अजून पकडतंय मला जाळ्यात
तुझीच स्मृती जपून ठेवलीय
माझ्या हृदयाच्या खोल कप्प्यात
तुझीच मूर्ती पुजून ठेवलीय
माझ्या मनाच्या गाभा-यात
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा