४१ . बिचारं मन
अजून तुझी आठवण येते
मन पुन्हा बेचैन होतं
झालं गेलं सगळं विसरून
पुन्हा तुझ्याकडे ओढ घेतं
अजून तू तयार होशील
मन वेडं आशेवर असतं
तुला मी आता आवडत नसेन
मानायलाच तयार नसतं
अजून तुझ्या विचारांतच
मन बिचारं झुरत असतं
किंमत तुला नसली तरी
तुझ्यावरच मरत असतं
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा