१० . तेवढंच काम
तू नुसतं बोलत रहावंस
आणि मी नुसतं ऐकत रहावं
तू छानसं हसत रहावंस
आणि मी नुसतं पहात रहावं
तू सारखं जवळ रहावंस
आणि मी तुला जपत रहावं
आयुष्यात करण्यासारखं
तेवढं एकच काम उरावं
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा