५८. आवडेल मला
आवडेल मला चालायला
हात तुझा हातात धरून
आवडेल मला बघायला
चेहरा तुझा ओंजळीत धरून
आवडेल मला काढायला
मेंदी तुझ्या हातावरती
आवडेल मला लावायला
हळद तुझ्या गालावरती
आवडेल मला घालायला
काजळ तुझ्या डोळ्यांमध्ये
आवडेल मला लावायला
कुंकू तुझ्या भांगामध्ये
आवडेल मला बघायला
तुला अशी सजलेली
आणि नव्या नवेलीत
लाज लाज लाजलेली
--- लबाड बोका
आवडेल मला चालायला
हात तुझा हातात धरून
आवडेल मला बघायला
चेहरा तुझा ओंजळीत धरून
आवडेल मला काढायला
मेंदी तुझ्या हातावरती
आवडेल मला लावायला
हळद तुझ्या गालावरती
आवडेल मला घालायला
काजळ तुझ्या डोळ्यांमध्ये
आवडेल मला लावायला
कुंकू तुझ्या भांगामध्ये
आवडेल मला बघायला
तुला अशी सजलेली
आणि नव्या नवेलीत
लाज लाज लाजलेली
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा