५९. साथ
जुळलेच जर सूर कधी
तुझे आणि माझे
नको सोडून जाऊ साथ
अर्ध्या मैफिलीमध्ये
मारीन मी आलाप आणि
घेईन सुंदर ताना
साथीला जर असशील तू तर
गाईन मी तराना
आळविन मी राग भारी
देईन उडवून बहार
फक्त तुझी साथ लागेल
आहेस का तयार
--- लबाड बोका
जुळलेच जर सूर कधी
तुझे आणि माझे
नको सोडून जाऊ साथ
अर्ध्या मैफिलीमध्ये
मारीन मी आलाप आणि
घेईन सुंदर ताना
साथीला जर असशील तू तर
गाईन मी तराना
आळविन मी राग भारी
देईन उडवून बहार
फक्त तुझी साथ लागेल
आहेस का तयार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा