६६. खास प्रेम
फोटो तुझा पहात बसतो
अक्षरश: मी तासन् तास
तरी मन भरत नाही
आणि मग होतो उदास
दिवास्वप्नं ही पहातो तुझी
आणखी होतात तुझेच भास
झुरतोय वेडा तुझ्यासाठी
लागलीय मला तुझीच आस
आठवण खूप येते तुझी
खूप होतो मला त्रास
उसासे मी टाकत बसतो
आणि जड होतो श्वास
जिंकीन तुला प्रेमाने मी
माझा माझ्या प्रेमावर विश्वास
लबाड बोका असलो तरी
प्रेम माझे आहे खास
---- लबाड बोका
फोटो तुझा पहात बसतो
अक्षरश: मी तासन् तास
तरी मन भरत नाही
आणि मग होतो उदास
दिवास्वप्नं ही पहातो तुझी
आणखी होतात तुझेच भास
झुरतोय वेडा तुझ्यासाठी
लागलीय मला तुझीच आस
आठवण खूप येते तुझी
खूप होतो मला त्रास
उसासे मी टाकत बसतो
आणि जड होतो श्वास
जिंकीन तुला प्रेमाने मी
माझा माझ्या प्रेमावर विश्वास
लबाड बोका असलो तरी
प्रेम माझे आहे खास
---- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा