७२. प्रपोज
माहित आहे पुरे मला
तुझ्यापुढे मी आहे सुमार
नक्कीच नसेन मी तरी
तुझ्या स्वप्नातला राजकुमार
जाणीव आहे खरंच मला
माझ्यातल्या न्यूनत्वाची
साथ तुझी हवीय मला
घेईन भरारी कर्तृत्वाची
नाही म्हणालीस आज तर
आयुष्यातून निघून जाईन
सांग जरा विचार करून
होशील का माझी व्हॅलेंटाईन
--- लबाड बोका
माहित आहे पुरे मला
तुझ्यापुढे मी आहे सुमार
नक्कीच नसेन मी तरी
तुझ्या स्वप्नातला राजकुमार
जाणीव आहे खरंच मला
माझ्यातल्या न्यूनत्वाची
साथ तुझी हवीय मला
घेईन भरारी कर्तृत्वाची
नाही म्हणालीस आज तर
आयुष्यातून निघून जाईन
सांग जरा विचार करून
होशील का माझी व्हॅलेंटाईन
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा