७४. दु:ख
बसतो उदास एकटाच
तुझी आठवण काढत
गिळतो मी आतल्याआत
माझेच अश्रू कढत
लपवतो मी साऱ्यांपासून
माझी करुण व्यथा
अश्रूंनीच भिजली आहे
माझ्या प्रेमाची गाथा
कसा जगू तुझ्याशिवाय
अजून येतंय भरून
जगतो मी असाच आता
थोडा थोडा मरून
--- लबाड बोका
बसतो उदास एकटाच
तुझी आठवण काढत
गिळतो मी आतल्याआत
माझेच अश्रू कढत
लपवतो मी साऱ्यांपासून
माझी करुण व्यथा
अश्रूंनीच भिजली आहे
माझ्या प्रेमाची गाथा
कसा जगू तुझ्याशिवाय
अजून येतंय भरून
जगतो मी असाच आता
थोडा थोडा मरून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा