७६. ओलेती
अशा कुंद पाऊसवेळी
असावीस तू सोबत
गार वारा अंगाला
असेल जेव्हा झोंबत
काळ्याकुट्ट ढगांनी
दिवसाच करावी रात
फडफडणाऱ्या दिव्याचीही
विझून जावी वात
बसेन तुझ्या जवळ
घेईन हातात हात
त्या रम्य क्षणांची
औरच असेल बात
गळून पडावे बंध
त्या धुंद एकांती
घेईन मिठीत घट्ट
तशीच तुला ओलेती
--- लबाड बोका
अशा कुंद पाऊसवेळी
असावीस तू सोबत
गार वारा अंगाला
असेल जेव्हा झोंबत
काळ्याकुट्ट ढगांनी
दिवसाच करावी रात
फडफडणाऱ्या दिव्याचीही
विझून जावी वात
बसेन तुझ्या जवळ
घेईन हातात हात
त्या रम्य क्षणांची
औरच असेल बात
गळून पडावे बंध
त्या धुंद एकांती
घेईन मिठीत घट्ट
तशीच तुला ओलेती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा