७७. प्रॉब्लेम
आवडली आहे एक मुलगी
आहे साला मस्त मेवा
रोज करतो प्रार्थना मी
हीच मला मिळू दे देवा
रोज करतो प्रयत्न आणि
रोज आखतो डाव नवा
पण ती समोर येताच मात्र
गुल होते सगळी हवा
हेच चाललंय कधीपासून
काहीच लागत नाही दुवा
काय करावं सालं आता
काहीच कळत नाही बुवा
काहीतरी करा मदत
दाखवा काही मार्ग नवा
हिम्मत माझी वाढेल अशी
काहीतरी सुचवा दवा
यायला पाहिजे मजा अशी
यायला हवा हुरूप नवा
असं काही सांगा यारो
होकार तिचा यायला हवा
--- लबाड बोका
आवडली आहे एक मुलगी
आहे साला मस्त मेवा
रोज करतो प्रार्थना मी
हीच मला मिळू दे देवा
रोज करतो प्रयत्न आणि
रोज आखतो डाव नवा
पण ती समोर येताच मात्र
गुल होते सगळी हवा
हेच चाललंय कधीपासून
काहीच लागत नाही दुवा
काय करावं सालं आता
काहीच कळत नाही बुवा
काहीतरी करा मदत
दाखवा काही मार्ग नवा
हिम्मत माझी वाढेल अशी
काहीतरी सुचवा दवा
यायला पाहिजे मजा अशी
यायला हवा हुरूप नवा
असं काही सांगा यारो
होकार तिचा यायला हवा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा