७८. मायाजाल
तगमग होतेय जीवाची
नुसतीच होतेय उलघाल
करमत नाही तुझ्याशिवाय
काय झालेत माझे हाल
नजरेसमोर दिसते सारखी
तिच तुझी मादक चाल
मनही झुलतं तसंच मग
तोच धरून सुंदर ताल
खुणावतात मला तुझे ते
मऊ रेशमी साजूक गाल
चुंबत असतो मनात मी
ओठ तुझेच नाजूक लाल
तुझ्याच तर तंद्रीमध्ये
वावरतो मी आजकाल
टाकून गेलीस माझ्यावर
जीवघेणं हे मायाजाल
--- लबाड बोका
तगमग होतेय जीवाची
नुसतीच होतेय उलघाल
करमत नाही तुझ्याशिवाय
काय झालेत माझे हाल
नजरेसमोर दिसते सारखी
तिच तुझी मादक चाल
मनही झुलतं तसंच मग
तोच धरून सुंदर ताल
खुणावतात मला तुझे ते
मऊ रेशमी साजूक गाल
चुंबत असतो मनात मी
ओठ तुझेच नाजूक लाल
तुझ्याच तर तंद्रीमध्ये
वावरतो मी आजकाल
टाकून गेलीस माझ्यावर
जीवघेणं हे मायाजाल
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा