७९. असह्य
मस्त अंधारून आलंय बाहेर
मध्येच लख्ख चमकतेय वीज
धुवाधार कोसळतोय पाऊस
आठवण मला येतेय तुझीच
तू हवी होतीस आता
घेतलं असतं तुला कवेत
तेवढीच वाटली असती ऊब
थंड ओल्या या हवेत
असह्य झालाय विरह तुझा
दिसतंय आता तुझंच रूप
भिजतोय चिंब पावसामध्ये
आतून मात्र पेटलोय खूप
--- लबाड बोका
मस्त अंधारून आलंय बाहेर
मध्येच लख्ख चमकतेय वीज
धुवाधार कोसळतोय पाऊस
आठवण मला येतेय तुझीच
तू हवी होतीस आता
घेतलं असतं तुला कवेत
तेवढीच वाटली असती ऊब
थंड ओल्या या हवेत
असह्य झालाय विरह तुझा
दिसतंय आता तुझंच रूप
भिजतोय चिंब पावसामध्ये
आतून मात्र पेटलोय खूप
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा