८०. शिल्लक
तुझ्यावाचून झालोय मी
त्राण निघून गेल्यासारखा
जगतो आहे असाच मी
जिवंत असून मेल्यासारखा
तूच होतीस स्वप्नं माझी
तूच होतीस माझा ध्यास
तूच होतीस प्राण माझा
तूच होतीस माझा श्वास
तुझीच आठवण घालत असते
माझ्या मनात सतत रुंजी
सगळं काही गेलंय निसटून
तेवढीच शिल्लक राहिलीय पूंजी
--- लबाड बोका
तुझ्यावाचून झालोय मी
त्राण निघून गेल्यासारखा
जगतो आहे असाच मी
जिवंत असून मेल्यासारखा
तूच होतीस स्वप्नं माझी
तूच होतीस माझा ध्यास
तूच होतीस प्राण माझा
तूच होतीस माझा श्वास
तुझीच आठवण घालत असते
माझ्या मनात सतत रुंजी
सगळं काही गेलंय निसटून
तेवढीच शिल्लक राहिलीय पूंजी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा