८२. ऊतू
प्रेमात तुझ्या पडलोय तर
मलाच नमतं घ्यायला हवं
खूश तुला ठेवण्यासाठी
सर्वस्व माझं द्यायला हवं
इतर सर्व गोष्टींपेक्षा
तुलाच महत्व द्यायला हवं
प्रेम तुझं वाढेपर्यंत
सांभाळूनही घ्यायला हवं
आकंठ तुझ्या प्रेमात बुडून
प्रेमात तुझ्या न्हायला हवं
प्रेम ऊतू गेलंच तर
मला ते प्यायला हवं
--- लबाड बोका
प्रेमात तुझ्या पडलोय तर
मलाच नमतं घ्यायला हवं
खूश तुला ठेवण्यासाठी
सर्वस्व माझं द्यायला हवं
इतर सर्व गोष्टींपेक्षा
तुलाच महत्व द्यायला हवं
प्रेम तुझं वाढेपर्यंत
सांभाळूनही घ्यायला हवं
आकंठ तुझ्या प्रेमात बुडून
प्रेमात तुझ्या न्हायला हवं
प्रेम ऊतू गेलंच तर
मला ते प्यायला हवं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा