८३. दिलासा
अजून तुझी याद येते
अजून होतो डोळा ओला
नशिबच माझं आहे असं
रिताच राहिला माझा झोला
करत राहीन प्रेम तुझ्यावर
देणार नाही त्रास तुला
ठेव भरवसा माझ्यावर तू
घे जरा तू श्वास खुला
नको करू चिंता नसत्या
नको कोमेजू माझ्या फुला
मनातच झुलवत राहिन मी
तुझ्या आठवणीचा झुला
--- लबाड बोका
अजून तुझी याद येते
अजून होतो डोळा ओला
नशिबच माझं आहे असं
रिताच राहिला माझा झोला
करत राहीन प्रेम तुझ्यावर
देणार नाही त्रास तुला
ठेव भरवसा माझ्यावर तू
घे जरा तू श्वास खुला
नको करू चिंता नसत्या
नको कोमेजू माझ्या फुला
मनातच झुलवत राहिन मी
तुझ्या आठवणीचा झुला
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा