८५. स्मरण रंजन
माहित आहे पूर्ण मला
येणार नाहीत ते दिवस परत
तरीही जगतो आशेवरती
रोज तिच प्रार्थना करत
त्याच त्या सुखद आठवणी
सोडत नाही पिच्छा अजून
तशाच येतात पुन्हा पुन्हा
स्वप्नामध्येही सजून धजून
तेच स्वर्गीय मंजुळ स्वर
करत असतात कानात गुंजन
मी ही घेतो गुंतवून मन
करत बसतो स्मरण रंजन
--- लबाड बोका
माहित आहे पूर्ण मला
येणार नाहीत ते दिवस परत
तरीही जगतो आशेवरती
रोज तिच प्रार्थना करत
त्याच त्या सुखद आठवणी
सोडत नाही पिच्छा अजून
तशाच येतात पुन्हा पुन्हा
स्वप्नामध्येही सजून धजून
तेच स्वर्गीय मंजुळ स्वर
करत असतात कानात गुंजन
मी ही घेतो गुंतवून मन
करत बसतो स्मरण रंजन
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा