८९. दैवदुर्विलास
तुझं आहे प्रेम त्याच्यावर
त्याचं ही आहे प्रेम तुझ्यावर
विरोध करतात तुझ्या घरचे
राग त्यांचा होतो अनावर
तो ही हवा आहे तुला
घरचेही हवे आहेत तुला
गुंता झालाय सगळा असा
सोडवायला सांगते आहेस मला
काय असा हा दैवदुर्विलास
हसतोय मीच माझ्या नशिबावर
काय करू मी तरी आता
माझंच आहे प्रेम तुझ्यावर
--- लबाड बोका
तुझं आहे प्रेम त्याच्यावर
त्याचं ही आहे प्रेम तुझ्यावर
विरोध करतात तुझ्या घरचे
राग त्यांचा होतो अनावर
तो ही हवा आहे तुला
घरचेही हवे आहेत तुला
गुंता झालाय सगळा असा
सोडवायला सांगते आहेस मला
काय असा हा दैवदुर्विलास
हसतोय मीच माझ्या नशिबावर
काय करू मी तरी आता
माझंच आहे प्रेम तुझ्यावर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा