९०. अमर प्रेम
वाट बघतोय कधीची मी
पण तू अजून आहेस अबोल
निघून चाललाय अनमोल काळ
माझाही सुटत चाललाय तोल
कितींदा व्यक्त झालोय मी
पण तू मात्र अजून अव्यक्त
जास्त नाही अपेक्षा करत
एकदाच म्हण हो फक्त
आस लागली युगायुगांची
माझं आहे प्रेम तुझ्यावर
घुटमळत राहीन तुझ्याच भवती
आत्मा माझा नाही नश्वर
--- लबाड बोका
वाट बघतोय कधीची मी
पण तू अजून आहेस अबोल
निघून चाललाय अनमोल काळ
माझाही सुटत चाललाय तोल
कितींदा व्यक्त झालोय मी
पण तू मात्र अजून अव्यक्त
जास्त नाही अपेक्षा करत
एकदाच म्हण हो फक्त
आस लागली युगायुगांची
माझं आहे प्रेम तुझ्यावर
घुटमळत राहीन तुझ्याच भवती
आत्मा माझा नाही नश्वर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा