९२. उगाच
नको येऊस तु इथे
एकटाच मी आहे घरात
घडून जाईल काहीतरी
उगाच आवेगाच्या भरात
वाईट तुला वाटेल मग
येईल तुला माझा राग
तुझं नाही प्रेम माझ्यावर
उगाच पडून जाईल डाग
त्यापेक्षा तू लांबच बरी
नसता बभ्रा नको जनात
करत राहीन प्रेम तुझ्यावर
उगाच आपला मनातल्या मनात
--- लबाड बोका
नको येऊस तु इथे
एकटाच मी आहे घरात
घडून जाईल काहीतरी
उगाच आवेगाच्या भरात
वाईट तुला वाटेल मग
येईल तुला माझा राग
तुझं नाही प्रेम माझ्यावर
उगाच पडून जाईल डाग
त्यापेक्षा तू लांबच बरी
नसता बभ्रा नको जनात
करत राहीन प्रेम तुझ्यावर
उगाच आपला मनातल्या मनात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा