९३. युक्ती
पहात रहावंसं वाटतं तुला
सारखं डोळे भरून
वाटतं मला तुझ्याशिवाय
मी तर जाईन मरून
उघडून धरतो चेह-यासमोर
असंच एखादं पुस्तक
न्याहाळत असतो तेव्हा मी
तुलाच आपादमस्तक
लोकांना वाटतं उगाच की
वाचतोय मनापासून
लपवत असतो खरंतर
फोटो मी जनांपासून
--- लबाड बोका
पहात रहावंसं वाटतं तुला
सारखं डोळे भरून
वाटतं मला तुझ्याशिवाय
मी तर जाईन मरून
उघडून धरतो चेह-यासमोर
असंच एखादं पुस्तक
न्याहाळत असतो तेव्हा मी
तुलाच आपादमस्तक
लोकांना वाटतं उगाच की
वाचतोय मनापासून
लपवत असतो खरंतर
फोटो मी जनांपासून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा