९५. स्वैर
इतक्या जवळ असूनही
माझ्यासाठी तू आहेस दूर
तुझ्याचसाठी येतो माझा
आठवणींनी दाटून ऊर
वाट मी ही पहातो आहे
कधी कशी मिळेल संधी
अजून आहे तुझ्या माझ्यावर
नजरांची तीच प्राचीन बंदी
शरीरास माझ्या रोखले त्यांनी
पण मन माझे आहे स्वैर
मनानेच प्रेम करतो तुझ्यावर
त्यातही काही नाही गैर
--- लबाड बोका
इतक्या जवळ असूनही
माझ्यासाठी तू आहेस दूर
तुझ्याचसाठी येतो माझा
आठवणींनी दाटून ऊर
वाट मी ही पहातो आहे
कधी कशी मिळेल संधी
अजून आहे तुझ्या माझ्यावर
नजरांची तीच प्राचीन बंदी
शरीरास माझ्या रोखले त्यांनी
पण मन माझे आहे स्वैर
मनानेच प्रेम करतो तुझ्यावर
त्यातही काही नाही गैर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा