९६. धुंद
हसतेस तू जेव्हा
पडते गालावर खळी
लाजतेस पाहून मला
माझीही खुलते कळी
दिसत रहातं डोळ्यांसमोर
तुझं तेच रूप
वावरतो मी त्याच तंद्रीत
वाटतं मलाच अप्रूप
आवडतो मी तुला पण
वाटत नाही मलाच खरं
अशा या धुंद क्षणी
असशील मिठीत तर बरं
--- लबाड बोका
हसतेस तू जेव्हा
पडते गालावर खळी
लाजतेस पाहून मला
माझीही खुलते कळी
दिसत रहातं डोळ्यांसमोर
तुझं तेच रूप
वावरतो मी त्याच तंद्रीत
वाटतं मलाच अप्रूप
आवडतो मी तुला पण
वाटत नाही मलाच खरं
अशा या धुंद क्षणी
असशील मिठीत तर बरं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा