१००. उगाच
माझ्या रोजच्या वाटेवर
आहेत बरीच घरं
पण तुझ्या घरावरून जाताना
उगाच वाटतं बरं
कधी दिसतेस खिडकीत तू
कधी दिसतेस अंगणात
आणि उगाच माझं मन
न्हाऊन निघतं चांदण्यात
बघतेस जेव्हा माझ्याकडे तू
काळजात होते धडधड
तुला नुसतं पहाण्यासाठी
उगाच करतो धडपड
हसतेस कधी माझ्याशी तू
उगाचच मी लाजतो
आणि उगाच कानामध्ये
सनई चौघडा वाजतो
--- लबाड बोका
माझ्या रोजच्या वाटेवर
आहेत बरीच घरं
पण तुझ्या घरावरून जाताना
उगाच वाटतं बरं
कधी दिसतेस खिडकीत तू
कधी दिसतेस अंगणात
आणि उगाच माझं मन
न्हाऊन निघतं चांदण्यात
बघतेस जेव्हा माझ्याकडे तू
काळजात होते धडधड
तुला नुसतं पहाण्यासाठी
उगाच करतो धडपड
हसतेस कधी माझ्याशी तू
उगाचच मी लाजतो
आणि उगाच कानामध्ये
सनई चौघडा वाजतो
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा