१०१. पाठमोरी
तुला असे येताना पाहून
वाटते खूप बरे
पाझरू लागतात हृदयामधून
प्रेमाचे मग झरे
हसतेस जेव्हा लाजून तू
गालातल्या गालात
धडकू लागते हृदय माझे
आपोआप द्रुत तालात
मिठीत तुला घ्यायला तेव्हा
असतो मी अधिर
पण जवळ जेव्हा येतेस तू
होत नाही धीर
तू ही निघून जातेस मग
बघून वाट थोडी
पहात रहातो हताश मी
तुला पाठमोरी
--- लबाड बोका
तुला असे येताना पाहून
वाटते खूप बरे
पाझरू लागतात हृदयामधून
प्रेमाचे मग झरे
हसतेस जेव्हा लाजून तू
गालातल्या गालात
धडकू लागते हृदय माझे
आपोआप द्रुत तालात
मिठीत तुला घ्यायला तेव्हा
असतो मी अधिर
पण जवळ जेव्हा येतेस तू
होत नाही धीर
तू ही निघून जातेस मग
बघून वाट थोडी
पहात रहातो हताश मी
तुला पाठमोरी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा