१०२. अपेक्षाभंग
हलकेच सुटतो वारा
हलकेच उठतात तरंग
हलकेच जातात उधळून
प्रतिबिंबातील रंग
असतो असा कधी मी
स्वप्नामध्येच दंग
होतो कधी अवचित
असाच स्वप्नभंग
हवा असतो जेव्हा अन्
तुझा स्वर्गीय संग
तेव्हाच आणि नेमका
करतेस अपेक्षाभंग
--- लबाड बोका
हलकेच सुटतो वारा
हलकेच उठतात तरंग
हलकेच जातात उधळून
प्रतिबिंबातील रंग
असतो असा कधी मी
स्वप्नामध्येच दंग
होतो कधी अवचित
असाच स्वप्नभंग
हवा असतो जेव्हा अन्
तुझा स्वर्गीय संग
तेव्हाच आणि नेमका
करतेस अपेक्षाभंग
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा