१०५. समर्पण
खूप त्रास होतो मला
नसतोस तू जवळ
ये असा अचानक आणि
घट्ट मिठीत आवळ
धर चेहरा ओंजळीत माझा
चुंबून घे ओठ
येऊ दे आली तर
नियतीत तुझ्या खोट
आसुसलेय तुझ्यासाठी
कर माझं तर्पण
अनाघ्रात ही मी अशी
करते तुला समर्पण
--- लबाड बोका
तर्पण : तृप्त करणे ( मराठी विश्वकोष )
खूप त्रास होतो मला
नसतोस तू जवळ
ये असा अचानक आणि
घट्ट मिठीत आवळ
धर चेहरा ओंजळीत माझा
चुंबून घे ओठ
येऊ दे आली तर
नियतीत तुझ्या खोट
आसुसलेय तुझ्यासाठी
कर माझं तर्पण
अनाघ्रात ही मी अशी
करते तुला समर्पण
--- लबाड बोका
तर्पण : तृप्त करणे ( मराठी विश्वकोष )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा