१०४. दिवास्वप्न
कधी कधी वेळी अवेळी
मनात माझ्या नाचतो मोर
त्याला तसं कारण म्हणजे
तू तेव्हा असतेस समोर
वावरत असतेस आजूबाजूला
मी ही मग घुटमळतो तिथे
नजर माझी फिरत असते
जातेस तू जिथे जिथे
लाजून जेव्हा बघतेस तू
आनंदाच्या फुटतात उकळ्या
दिसतात मला शय्येवरती
अंथरलेल्या गुलाब पाकळ्या
--- लबाड बोका
कधी कधी वेळी अवेळी
मनात माझ्या नाचतो मोर
त्याला तसं कारण म्हणजे
तू तेव्हा असतेस समोर
वावरत असतेस आजूबाजूला
मी ही मग घुटमळतो तिथे
नजर माझी फिरत असते
जातेस तू जिथे जिथे
लाजून जेव्हा बघतेस तू
आनंदाच्या फुटतात उकळ्या
दिसतात मला शय्येवरती
अंथरलेल्या गुलाब पाकळ्या
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा