१०७. निराकार
करून बघितली एकदा मी
तुझी नी माझी बेरीज
तूच तेवढी झालीस जमा
तेव्हा माझ्याखेरीज
म्हणून केली वजाबाकी
माझी तुझ्यामधून
तूच फक्त राहिलीस शिल्लक
तरीही माझ्यामधून
करून बघितला पुन्हा मग
गुणाकार आणि भागाकार
समजून गेलो उत्तर पाहून
झालोय तुझ्यात निराकार
--- लबाड बोका
करून बघितली एकदा मी
तुझी नी माझी बेरीज
तूच तेवढी झालीस जमा
तेव्हा माझ्याखेरीज
म्हणून केली वजाबाकी
माझी तुझ्यामधून
तूच फक्त राहिलीस शिल्लक
तरीही माझ्यामधून
करून बघितला पुन्हा मग
गुणाकार आणि भागाकार
समजून गेलो उत्तर पाहून
झालोय तुझ्यात निराकार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा