११०. वंदन
स्तब्ध असतो वारा तरीही
उठत असतात तरंग डोहात
कितीही आवरलं मन तरी
पडत असतं पुन्हा मोहात
लागते पुन्हा तशीच ओढ
पुन्हा तशीच अनामिक हुरहुर
पुन्हा तशीच प्रतीक्षा आणि
पुन्हा तसाच धडधडतो ऊर
मन वेडं प्रेमासाठी
देतं झुगारून पुन्हा बंधनं
पुन्हा पुन्हा खाऊन ठोकर
प्रेमालाच करतं वंदन
--- लबाड बोका
स्तब्ध असतो वारा तरीही
उठत असतात तरंग डोहात
कितीही आवरलं मन तरी
पडत असतं पुन्हा मोहात
लागते पुन्हा तशीच ओढ
पुन्हा तशीच अनामिक हुरहुर
पुन्हा तशीच प्रतीक्षा आणि
पुन्हा तसाच धडधडतो ऊर
मन वेडं प्रेमासाठी
देतं झुगारून पुन्हा बंधनं
पुन्हा पुन्हा खाऊन ठोकर
प्रेमालाच करतं वंदन
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा