१११. तुझा वाढदिवस
माझ्यासाठी आहेस तू
सगळ्यांहूनही विशेष
भास होतात तुझे मला
आता कोणत्याही दिशेस
अशा माझ्या प्रिय फुला
आज तुझा वाढदिवस
मिळो उदंड आयुष्य तुला
मनात बोलतो नवस
सरलं आता आयुष्याचं
अजून एक वर्ष
वर्षागणिक होऊ देत
तुझा देखिल उत्कर्ष
पहातो मी आतुरतेने
ह्या दिवसाची वाट
डोळे भरून पाहू दे
आजचा तुझा थाट
तुझ्या वरच्या प्रेमाने
होतो मी भावविवश
असाच येऊ दे आयुष्यात
पुन्हा पुन्हा हा दिवस
--- लबाड बोका
माझ्यासाठी आहेस तू
सगळ्यांहूनही विशेष
भास होतात तुझे मला
आता कोणत्याही दिशेस
अशा माझ्या प्रिय फुला
आज तुझा वाढदिवस
मिळो उदंड आयुष्य तुला
मनात बोलतो नवस
सरलं आता आयुष्याचं
अजून एक वर्ष
वर्षागणिक होऊ देत
तुझा देखिल उत्कर्ष
पहातो मी आतुरतेने
ह्या दिवसाची वाट
डोळे भरून पाहू दे
आजचा तुझा थाट
तुझ्या वरच्या प्रेमाने
होतो मी भावविवश
असाच येऊ दे आयुष्यात
पुन्हा पुन्हा हा दिवस
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा