११५. अस्तित्व प्रेम
इतकी वर्षं झाली तरी
ओळखलंस फक्त जेमतेम
उगाच तुला वाटत असतं
शरीरावरच तुझ्या करतो प्रेम
शरीराचंच जर म्हणशील तर
आहेत तशा कित्येक जणी
तरी सुद्धा तूच का मग
भरलीस अशी माझ्या मनी
तुझ्यावरच्या प्रेमामुळेच
प्रेम करतो शरीरावर
अस्तित्व तरी असतं का मग
शरीरच जर नसतं तर
शरीरामुळेच आहे मी
शरीरामुळेच आहेस तू
शरीरामुळेच जातं ना गं
प्रेम मग आपलं ऊतू
--- लबाड बोका
इतकी वर्षं झाली तरी
ओळखलंस फक्त जेमतेम
उगाच तुला वाटत असतं
शरीरावरच तुझ्या करतो प्रेम
शरीराचंच जर म्हणशील तर
आहेत तशा कित्येक जणी
तरी सुद्धा तूच का मग
भरलीस अशी माझ्या मनी
तुझ्यावरच्या प्रेमामुळेच
प्रेम करतो शरीरावर
अस्तित्व तरी असतं का मग
शरीरच जर नसतं तर
शरीरामुळेच आहे मी
शरीरामुळेच आहेस तू
शरीरामुळेच जातं ना गं
प्रेम मग आपलं ऊतू
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा