११६. एकतर्फी प्रेम
पहातच नाही माझ्याकडे ती
बोलणं तर राहिलंच दूर
तरीही येतो तिला पहाताच
भावनांस माझ्या भलताच पूर
चुकून तिची पडते नजर
धडधडू लागतो माझा ऊर
आसपास ती असते तेव्हा
कानशिलांतून निघतो धूर
मनात करतो कल्पना काही
आणि होतो लाजून चूर
वाजू लागतात कानांमध्ये
सनईचे मग मंगल सूर
--- लबाड बोका
पहातच नाही माझ्याकडे ती
बोलणं तर राहिलंच दूर
तरीही येतो तिला पहाताच
भावनांस माझ्या भलताच पूर
चुकून तिची पडते नजर
धडधडू लागतो माझा ऊर
आसपास ती असते तेव्हा
कानशिलांतून निघतो धूर
मनात करतो कल्पना काही
आणि होतो लाजून चूर
वाजू लागतात कानांमध्ये
सनईचे मग मंगल सूर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा