११९. प्रतीक्षा
गेलीस तू सोडून मला
तरीही मी आहे हयात
आहेस तू अजून तशीच
माझ्या भग्न हृदयात
रोज असतो बसलेला मी
वाटेवरती डोळे लावून
रोज उमलते आशा मनात
रोज जातो पुन्हा बावून
पहायचाच असेल तुला तर
पहाच तूही माझा अंत
वाट बघत राहीन तुझी
जगाच्या अंतापर्यंत
--- लबाड बोका
गेलीस तू सोडून मला
तरीही मी आहे हयात
आहेस तू अजून तशीच
माझ्या भग्न हृदयात
रोज असतो बसलेला मी
वाटेवरती डोळे लावून
रोज उमलते आशा मनात
रोज जातो पुन्हा बावून
पहायचाच असेल तुला तर
पहाच तूही माझा अंत
वाट बघत राहीन तुझी
जगाच्या अंतापर्यंत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा