१२२. खात्री
करतेस प्रयत्न केविलवाणा
टाळण्याचा तू मला
माहित आहे तुला सुद्धा
माणूस आहे मी भला
नजरच तुझी सांगून जाते
तसं बरंच काही
असा मी ही देत नाही
भाव कोणालाही
कितीही आवर मनाला तू
मनच करील घात
एक ना एक दिवस
पडशीलच माझ्या प्रेमात
--- लबाड बोका
करतेस प्रयत्न केविलवाणा
टाळण्याचा तू मला
माहित आहे तुला सुद्धा
माणूस आहे मी भला
नजरच तुझी सांगून जाते
तसं बरंच काही
असा मी ही देत नाही
भाव कोणालाही
कितीही आवर मनाला तू
मनच करील घात
एक ना एक दिवस
पडशीलच माझ्या प्रेमात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा