१२४. कला
पाहिलं तुला पहिल्यांदा
तेव्हाच पडलो प्रेमात
लागत नाही लक्ष आता
तसं कुठल्याच कामात
तुझाच चेहरा येतो आता
सारखा डोळ्यांसमोर
आणि लागतो नाचायला
माझ्या मनाचा मोर
वेडा झालोय तुझ्यासाठी
सुचत नाही काही
तुझ्याशिवाय आता मला
चैन पडणार नाही
दुसरी कोणी नको आता
तूच हवीस मला
विश्वास ठेव माझ्यावरती
माणूस आहे मी भला
कर लग्न माझ्याशी
सुखात ठेवीन तुला
चंद्राप्रमाणे रोज रात्री
दाखवीन नवीन कला
--- लबाड बोका
पाहिलं तुला पहिल्यांदा
तेव्हाच पडलो प्रेमात
लागत नाही लक्ष आता
तसं कुठल्याच कामात
तुझाच चेहरा येतो आता
सारखा डोळ्यांसमोर
आणि लागतो नाचायला
माझ्या मनाचा मोर
वेडा झालोय तुझ्यासाठी
सुचत नाही काही
तुझ्याशिवाय आता मला
चैन पडणार नाही
दुसरी कोणी नको आता
तूच हवीस मला
विश्वास ठेव माझ्यावरती
माणूस आहे मी भला
कर लग्न माझ्याशी
सुखात ठेवीन तुला
चंद्राप्रमाणे रोज रात्री
दाखवीन नवीन कला
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा