१२६. आठवण
इतकी वर्षं झाली तरी
विसरलो नाहीय अजून तुला
आठवणींच्या हिंदोळ्यावर
घेत असतं मन झुला
तेवढाच एक येऊन गेला
आयुष्यात माझ्या चांगला ऋतू
एखाद्या सुंदर स्वप्नासारखी
आलीस आणि गेलीस तू
तुझ्याच प्रेमाच्या शिदोरीवर
जगतोय अजून कसाबसा
आठवण तुझी येते आणि
अजून रडतो ढसाढसा
--- लबाड बोका
इतकी वर्षं झाली तरी
विसरलो नाहीय अजून तुला
आठवणींच्या हिंदोळ्यावर
घेत असतं मन झुला
तेवढाच एक येऊन गेला
आयुष्यात माझ्या चांगला ऋतू
एखाद्या सुंदर स्वप्नासारखी
आलीस आणि गेलीस तू
तुझ्याच प्रेमाच्या शिदोरीवर
जगतोय अजून कसाबसा
आठवण तुझी येते आणि
अजून रडतो ढसाढसा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा