१२७. जोम
मस्त दाटून आलाय काळोख
पाऊस पडतोय संततधार
एकटाच बसलो आहे मी
आठवण तुझी येते फार
खूप वाटतंय मनामधून
आत्ता यायला हवंस तू
ह्या धुंद एकांतात
फुलवू आपण नवा ऋतू
नक्की नक्की येशील तू
मन माझं सांगतंय पुकारून
लाज लज्जा नीतिनियम
माझ्यासाठी येशील झुगारून
छळतोय मला हा एकटेपणा
आणि अशी ही कुंद हवा
ये ना ये ना ये ना प्रिये
आलाय आता जोम नवा
--- लबाड बोका
मस्त दाटून आलाय काळोख
पाऊस पडतोय संततधार
एकटाच बसलो आहे मी
आठवण तुझी येते फार
खूप वाटतंय मनामधून
आत्ता यायला हवंस तू
ह्या धुंद एकांतात
फुलवू आपण नवा ऋतू
नक्की नक्की येशील तू
मन माझं सांगतंय पुकारून
लाज लज्जा नीतिनियम
माझ्यासाठी येशील झुगारून
छळतोय मला हा एकटेपणा
आणि अशी ही कुंद हवा
ये ना ये ना ये ना प्रिये
आलाय आता जोम नवा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा