१२८. अगतिक
जाणवलंय मला कधीचंच
वागण्यामधून तुझ्या थोडं
मन तुझं घेत आहे
माझ्याकडेच पुन्हा ओढ
दिसते मला नजरेत तुझ्या
तुझी सारी अगतिकता
मी सुद्धा आहे अगतिक
नाहीतरी तुझ्याच इतका
काय करू शकतो आपण
तोडू शकत नाही बंध
का कळत नाही जगाला
प्रेम असंच असतं अंध
--- लबाड बोका
जाणवलंय मला कधीचंच
वागण्यामधून तुझ्या थोडं
मन तुझं घेत आहे
माझ्याकडेच पुन्हा ओढ
दिसते मला नजरेत तुझ्या
तुझी सारी अगतिकता
मी सुद्धा आहे अगतिक
नाहीतरी तुझ्याच इतका
काय करू शकतो आपण
तोडू शकत नाही बंध
का कळत नाही जगाला
प्रेम असंच असतं अंध
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा