१३२. मनकवडा
काय बघतेस अशी
पुन्हा पुन्हा निरखून
जेवढी बघशील जास्त
तेवढी जाशील हरखून
फोटो माझा बघून
वाटतंय ना बरं
ओळखलं की नाही
सांग मला खरं
बघ कसं उडतंय
हृदयही तालात
पटलं म्हणूनच ना
हसलीस ना गालात
मला कसं कळलं
वाटलं ना नवल
आहे मी मनकवडा
मिठीत ये चल
--- लबाड बोका
काय बघतेस अशी
पुन्हा पुन्हा निरखून
जेवढी बघशील जास्त
तेवढी जाशील हरखून
फोटो माझा बघून
वाटतंय ना बरं
ओळखलं की नाही
सांग मला खरं
बघ कसं उडतंय
हृदयही तालात
पटलं म्हणूनच ना
हसलीस ना गालात
मला कसं कळलं
वाटलं ना नवल
आहे मी मनकवडा
मिठीत ये चल
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा