१३५. वेडा
आठवत असते अजून
शेवटची भेट आपली
त्याच जुन्या जखमेवरची
निघते पुन्हा खपली
इतकी वर्ष झाली तरी
नाही विसरू शकलो
जे घडणारच नाही त्याची
वाट पाहून थकलो
जखम घेऊन काळजात
जाईन असाच मरून
शुद्धीत पूरा असूनही
गेलोय वेडा ठरून
--- लबाड बोका
आठवत असते अजून
शेवटची भेट आपली
त्याच जुन्या जखमेवरची
निघते पुन्हा खपली
इतकी वर्ष झाली तरी
नाही विसरू शकलो
जे घडणारच नाही त्याची
वाट पाहून थकलो
जखम घेऊन काळजात
जाईन असाच मरून
शुद्धीत पूरा असूनही
गेलोय वेडा ठरून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा